UMA PATIL

Tragedy

4  

UMA PATIL

Tragedy

भाकरीचा चंद्र

भाकरीचा चंद्र

1 min
9.8K


भाकरीचा चंद्र मागत भिकारी दिवसभर फिरायचा...

आणि रात्री चंद्रप्रकाशात तीच भाकर खायचा...


भाकर मिळाल्यावर त्याला व्हायचा चंद्र गवसल्याचा आनंद...

बाप म्हणतो, "भिकार्याला नसते कुठलीही जात - पात"...


याच भाकरीने केला आहे आजपर्यंत अनेकांचा घात...

भिकार्याला नसते कोणतेही कुटूंब, बायको, पोरं...


त्याचे असते भाकरीवरच प्रेम फक्त...

भाकरीमुळेच भरते त्याचे पोट तुडूंब...


सकाळच्या प्रहरी न्याहारीला भाकरी रांधते बाई...

तेव्हा दारातून भिकारी ओरडतो, "भाकर वाढ गं माई"...


माझी माय रांधायची सुगंधी खरपूस भाकर...

आठवण तिची येताच तोंडावर पसरते साखर...


अधाशी पोटी चतकोर भाकर खाल्ल्याचा आनंद...

कुठल्याही पंचपक्वानांत नाही मिळाला आजतागायत...


भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी मी कष्टतो दिवसरात्र...

आज जेव्हा मी हाॅटेलमधून पिझ्झा-बर्गर खाऊन पडतो...


तेव्हा एक भिकारी माझ्याकडे भाकर मागत असतो...

मी त्याला काहीच देत नाही, बघत सुद्धा नाही त्याच्याकडे...


अशावेळी मला स्वतःला मी भिकारी झाल्यासारखा वाटतो...

मी भिकारी झाल्यासारखा वाटतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy