Read On the Go with our Latest e-Books. Click here
Read On the Go with our Latest e-Books. Click here

Vijay Sanap

Drama Fantasy Tragedy


3  

Vijay Sanap

Drama Fantasy Tragedy


खरं सांग देवा

खरं सांग देवा

1 min 13.6K 1 min 13.6K

खरं सांग देवा तुझा ठाव ठिकाना काय आहे

मांदिर, मस्जिद, गुरुद्वारा कुठे तुझा पाय आहे ---- ||


आजपर्यंत कधी कुणाला भेटला होतास का ?

नवस बोलून कधी कुणाला पावला होतास का ? ---- ||


एक दिवस उपाशी राहून उपवास नाही घडला

कीर्तन भजन करूनही तू हट्ट नाही सोडला -----||


काय सांगतो तुला तुझंच सांभाळल्या जात नाही

मंदिराचा कळस कोण नेतं कसं तुला कळत नाही ----||


आरं सगळे उपाशी राहून पहिला निवद तुला घालतो

मी वाजवितो टाळ म्हणतो आरती तू मौन पाळतो -----||


जिथं तिथं संकटकाळी लावतो तुझा वशीला

नाही पावला अजून कधीच माझ्या नवसाला -----||


आता काय म्हणावं तुला हे मलाच कळत नाही

पतीत पावन नाव तुझे तूच कधी पाळत नाही ---||


आता तरी खरं बोल देवा तू आहेस तरी कुठं

का उगाच आपलं फुकटच नाव केलंस मोठं -----||


आई म्हणते पाया पड बाबा म्हणतो पाया पड

तू सांग माझ्या जीवाची का रे अशी फडफड ----||


Rate this content
Log in

More marathi poem from Vijay Sanap

Similar marathi poem from Drama