STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Drama

4  

Rohit Khamkar

Abstract Drama

सामना

सामना

1 min
371

शेवटचा तो प्रहर भयानक, काळघालू काळ्या रात्रीचा.

बिथरलो तुतटाच एकच धागा, दोरीचा भरवसा मात्र खात्रीचा.


अचानक हे असे का घडावे, भेदरलेली स्थिती परिवाराची.

वडिलांची तब्येत खालावली, विसर पडली क्रिया करायची.


सगळ समोर घडत होत, काय करावे सुदरत नव्हते.

धावपळीत विसर पडला असा साधनांचा, वैद्य गाठणे महत्वाचे होते.


धीर थोडा आवरून, हालचालीनां दिला भरपूर वेग.

उपचार सुरू झाले तसे, मनाला लागली काळजीची मेख.


पहिला प्रहर सुरू झाला, आता विचारही झाले शांत.

बसल्या जागी पेंगत होतो, डोळ्यांनाही आली थोडी भ्रांत.


डोळे उघडले तशी जाग आली, समोर सगळे प्रसन्न दिसत होते.

सगळ्यांनी मिळून सामना केला, तेव्हा संकटच ठरले खोटे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract