काय सांगू तुला
काय सांगू तुला

काय चाललंय काय बोलतोय, कळतं नाही मला.
काय चूक काय बरोबर व्यथा सारी, काय सांगू तुला.
आहे मी तापट, सोडी शब्दांचा मुक्त सोहळा.
तू तर समजून घे हक्काने, काव काव मी कावळा.
मिसळून गेली नाती, जमा होतो सारा गोतावळा.
काय चूक काय बरोबर व्यथा सारी, काय सांगू तुला.
बोलतो टोकाचे जसे, भासते बोलतो ठासून.
मीही कित्येकदा रडतो शांत, काळोख्यात एकटा बसून.
सोबत तुमची हवी कायम, बाकी जिकंन्या कायम मार्ग खुला.
काय चूक काय बरोबर व्यथा सारी, काय सांगू तुला.
संपून सारी नाती, मी आज माझ्यावर रुसलो.
कधी काळी जिंकलो असेल, आठवून ते हसलो.
आपल्या लोकांच्या आठवणीत, थोडा डोळा ओला झाला.
काय चूक काय बरोबर व्यथा सारी, काय सांगू तुला.
हा मी चुकलोय खूप, पण द्वेष नव्हता तुझा.
कायम तुला कमी लेखतो, हाच गुन्हा माझा.
गुंतलो गुरफटीत मी, हाती घेतला तो प्याला.
काय चूक काय बरोबर व्यथा सारी, काय सांगू तुला.