STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Classics Fantasy

3  

Rohit Khamkar

Tragedy Classics Fantasy

काही कळेना

काही कळेना

1 min
47

काय झालं कुणास ठाऊक, हल्ली लेखणी माझी चालेना

विचारांचा काहूर ठप्प झालाय, मलाही काही कळेना

शब्दांची रेलचेल मांडणीत, रचना काही जुळेना

वळणे येत आहेत खूप आयुष्यात, पण शब्द काही वळेना

एकाकी पणा माझा, मला सोडून काही पळेना

विचारांचा काहूर ठप्प झालाय, मलाही काही कळेना

शोधतोय सारं असं, पण नेमकं काही मिळेना

आठवणीत तूझ्या मला, घास काही गिळेना

मळलो जरी सारा असा, तरी विचार काही मळेना

विचारांचा काहूर ठप्प झालाय, मलाही काही कळेना

लंगडा झालाय जीव, पाळायचं सोडा साधं चालेना

आग केव्हाची लागली उरी, शांत बसूनही विझेना

नेमकं काय ते सांगता येईना, पण मनात काही मावेना

विचारांचा काहूर ठप्प झालाय, मलाही काही कळेना

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy