सोबत तुझी...
सोबत तुझी...

एवढा कामात गुंतलोय, सवड नाही बसण्यासाठी.
थोडासा वेळ काढतोय, सोबत तुझी असण्यासाठी.
कितीही थकलो कामावरती, पाहता तुला ऊर्जा मिळते.
ताण सारा निघून जातो, आनंद काय ते कळते.
हाच योग्य वेळ आहे, बालपण तुझे पाहण्यासाठी.
थोडासा वेळ काढतोय, सोबत तुझी असण्यासाठी.
तुझं हसणं तुझं रडणं, सारं बघायचंय मला.
पुन्हा बाळ होऊन तुझ्यासारखं, तुझ्यासोबत खेळायचंय माहीत आहे का तुला.
कित्येक नाटकी करतो हल्ली, बाळा तुला हसवण्यासाठी.
थोडासा वेळ काढतोय, सोबत तुझी असण्यासाठी.
विश्व विसरून जातो अगदी, तुझे पाहताना हट्ट.
प्रत्येक ते स्वप्न तुझे पूर्ण करेल, निश्चय केला घट्ट.
तरीही तुला चिडवेल थोडं, हलकं असं रुसण्यासाठी.
थोडासा वेळ काढतोय, सोबत तुझी असण्यासाठी.
तुला असं खेळतं पाहताना, मन माझं भरून येतं.
अलगद असं शांत गार वारं, हळुवार स्पर्श करून जातं.
बहुत काही आहे अजून, शब्द पुरणार नाहीत सांगण्यासाठी.
थोडासा वेळ काढतोय, सोबत तुझी असण्यासाठी.