काळीज काटा ...
काळीज काटा ...


वाटतंय तुफानात, अडकलोय असा एकटा.
बोचतंय सारं मना, जसा रुतलाय काळीज काटा.
भरवसा नाही कोण्हा, इथं पेरलाय धोका.
आपलेच हसले की, वाढतोय काळजाचा ठोका.
साऱ्यांना लागलीया भूक, वेगळा माझा वाटा.
बोचतंय सारं मना, जसा रुतलाय काळीज काटा.
बगावत कर तू मना, पूना नाही दुजा मोका.
थांबशील जागेवरी, निस्तारित उभा मुका.
पाहतोय जगताना, नात्यातला नफा तोटा.
बोचतंय सारं मना, जसा रुतलाय काळीज काटा.
काय ओळखावा कोण्हा, उचलली तिरडी ज्यांनी.
देतील शेवट खांदा, आयुष्यभर विरोध केला त्यांनी.
जगण्याची रीत सोपी, सोबतीला रुबाब खोटा.
बोचतंय सारं मना, जसा रुतलाय काळीज काटा.
मान झुकली आहे केव्हाची, बाकी आहे श्वास सारा.
उठून मी पळेल पुन्हा, जसा वाहतो सोसाट वारा.
बोलतील सारे गोड, दाबतील माझ्या पोटा.
बोचतंय सारं मना, जसा रुतलाय काळीज काटा.