STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Drama Romance Inspirational

4  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Drama Romance Inspirational

संसाराचा गाढा

संसाराचा गाढा

1 min
481

प्राजक्ताची फुलं अंगणात पहुडली होती

सकाळच्या निद्रेची भांती बहुधा त्यांच्या डोळ्यांत होती

तुझ्या सुवासाने ती उठून जागी झाली

अलगद तुझ्या केसांत गजरा बनून माळली


माझ्या सौंदर्यात असे काय होते 

या काळया रंगावर तू भाळली होती

म्हणायची तेव्हा, रंग, रूप मौल्यवान नसती

कसं सांगू तुला तुझ्यापुढे हिरे माणके फिके पडती


मोहकणाऱ्या गजऱ्याचा आता चोथा होऊ लागलाय

चेहऱ्यावरचा साजरेपणा आता ओसरू लागलाय

माझ्या तुझ्या डोळ्यांवर हळू हळू अंधार होतोय

तू आवंढा घेतेयस पण अश्रू मात्र मी गिळतोय


पोटची पाखरं कधीच उडून आपापल्या घरट्यात गेली

लाड, माया, बालपण, शिक्षण, आठवण चुलीत गेली

कुणास ठावूक नियती आधी कुणावर रुसतेय

म्हाताऱ्या संग म्हातारी संसाराचा गाढा ओढतेय...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama