यातना सुखाच्या
यातना सुखाच्या
भाळले रे मी तुझ्यावर ,तुझ्या कर्तृत्वावर
आणि तुझ्या प्रेमावर नि तुझ्या प्रतिभेवर
मनापासून प्रेम करतोस ना रे तू माझ्यावर
कसं रे सांगू सख्या, मी तुझ्याचसंगे बहरणार !!
बघ उजळुनी गेली माझी कांती
दिसते ना मी छान, बघ ना रे एकदा वळुनी
पापण्याही तूझ्या कधी कधी मला खुणावतात रे
डोळे ही तुझे मला तुझा अंतर्भाव सांगतात रे
तूच माझा सांगाती नि तूच रे माझा सोबती
जोडा भासे बघ आपुला, लक्ष्मी-नारायण शोभती
तुझ्या - माझ्या संसारि येईल रे सुंदर परी
तुझ्यासारखाच राग सदा असुदे तिच्या नाकावरी
ऐक शेवटी मी काय सांगते, जरी असे मी देवाघरी
नजर कायम आहे बघ माझी तुम्हां दोघांवरी
जरी नसे माझा सहवास तुला जीवनभरी
परी ने तू आपल्या परीला बहू पैलतीरी..
