STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational Others

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational Others

बाप...

बाप...

1 min
191

बाप कष्टाची भाकर

बाप आयुष्याचा दोर

त्याचा पाय निखाऱ्यावर

तरी सांभाळी परिवार


बाप करी वणवण

त्याला नसे कशाचं भान 

झिजलंया शरीर तरी 

करी शिदोरी साठवण


रानी वनी फिरताना

बाप घेतो खांद्यावर

गर्द हिरवळी संगे

होते जगाची सफर


बाप पहाडासारखा

माझा दैव पाठीराखा

बाप गंध चांदनाचा 

बाप रंग जीवनाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational