STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Abstract Inspirational Thriller

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Abstract Inspirational Thriller

पुस्तकी मरण

पुस्तकी मरण

1 min
181

मरण असं यावं की, छाताडावर एक पुस्तक असावं 

कव्हरच्या आत डोकावून निजलेल्या देहाने वाकून पहावं

वाचला जावा पुस्तकातील एक एक शब्द काळजाने

भरला जावा वारा फुफ्फुसात अक्षरांच्या कोलाहलाने

आणि डोळे मिटून पुन्हा तसंच निस्तेज पडून राहावं


डोळ्यांच्या बुब्बुळात आता स्पष्ट मला दिसेल का ?

वाचण्यासाठी पुस्तकही साथ मला देईल का ?

रोज त्यालाच वाचत असतो मी, हे त्याला कळेल का ?

कफन मध्ये गुंडाळल्यावर तो माझ्यासह येईल का ?

की, मीच पुन्हा डोळे मिटून निस्तेज पडून राहू का ?


मेंदूत लहर उठावी अचानक झालेल्या शब्द संहाराने

शब्दांतल्या अक्षरांची तळमळ समजतेय का बघावं

प्रत्येक पानाचा येणारा सुगंध गुंतवून ठेवावा श्वासाने

हृदयाच्या स्पंदनांनी एक एक पान उघडत जावं

आणि डोळे मिटून पुन्हा तसंच निस्तेज पडून राहावं


पुस्तकात इतका गुंतलोय, जीवही सोडवत नाही

सोडून जातोस मला, तुला कसं कळत नाही काही

मला उचलून कवटाळणारा, वाचणारा उरणार नाही

तर मीही माझे शब्द, अक्षरं यांचा पसारा करणार नाही

का ? बांधून घेऊ मी स्वतःला शब्दांत, मीही पुस्तक होणार नाही...

मीही पुस्तक होणार नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract