STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Classics Fantasy

4  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Classics Fantasy

शब्दांची कविता

शब्दांची कविता

1 min
419

काय लिहावे, कसे लिहावे, सुचतच नव्हते

या समूहात येऊन हात झाले हो लिहिते

शब्दांची जुळवाजुळव, काना, मात्रा, वेलांटी

धांदल होऊन माझी घ्यायचो मी गुलाटी


काहीच समजायचे नाही, अक्षरांची व्हायची मोडतोड

कधी कधी तर भन्नाट तर कधी व्हायचे शब्द सडेतोड

कुणाला लागायचे, कोणी प्रतिक्रियांतून बोलायचे

कोणी काही बोलो पण लिहायचे नाही थांबवायचे


अक्षरं, शब्दही कधीतरी माझ्याशी संवाद करायचे

काय रे, कळत नाही म्हणून आम्हाला कसेही मांडायचे

आम्ही बसतो जाऊन डायरेक्ट लोकांच्या डोक्यात

समजून पण काही शिरत नाही त्यांच्या त्या खोक्यात


असाच शब्दांचा मेळ आणि माझा खेळ चाललेला असतो

समूहाच्या यादीत असलेलं नाव बघून मी उगाच हसतो

कसा होशील रे तू कवी, असा दोष स्वतःलाच देतो

पुन्हा लेखणी उचलून अशी शब्दांची कविता लिहितो

                  शब्दांची कविता लिहितो...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics