मीच आहे कृष्ण
मीच आहे कृष्ण


मीच आहे कृष्ण
अन मीच आहे कान्हा
निळ्याशार आभाळा फुटे
माझ्या रंगांचाच पान्हा
मी उधळते रंग
अन मीच वाजविते पावा
सुरांच्या झुल्यावर मग मीच घेई हेलकावा
मीच धारण केले हाती चक्र सुदर्शन
अन,संकट समयी करेन मीच माझे रक्षण
मीच आहे मोरपीस अन मीच स्पर्शाची अनुभूती
मी चालते वाट एकली अन मीच माझा सारथी
मीच माझे मी पण ,अन मीच व्यापते आकाश
गर्द अंधारी रात्रीमागून मीच उगवता प्रकाश
अशी मीच आहे जर माझ्यातच दंग
सांग कृष्णा तू आता कसा लावशील रंग...
सांग कृष्णा तू आता कसा लावशील रंग...