आगमन वसंत ऋतुचे
आगमन वसंत ऋतुचे


आगमन वसंत ऋतुचे होता
सडा प्राजक्ताचा पडे दारी
जाईजुई गंधाळून गेल्या न्
ये रे सख्या भेटाया माघारी
पानगळ होताना मोसमांत
सुटला धुंद मोहर आंब्याचा
फांदीवरती कोवळी पालवी
स्वर कोकिळेच्या कुजनाचा
झुले झोपाळा अंगणात राती
भेटती सख्या प्रेमळ साजणी
सुख आले माहेराच्या वाटेवरी
वाट पाहती जीवाच्या मैत्रिणी
चैत्रपालवीचा सण पाडव्याचा
बंधुराया माहेरा न्यायला येता
सणसोहळा वाटतो सुखाचा
मायबाप माहेराची ओढ होता
लेकीबाळा सुनामुली मिळूनी
खेळती झिम्माफुगडी अंगणात
दारी घातले उन्हातच वाळवण
ठेवू धान्य भरूनीच कोठारांत
तप्तभास्कर डोई वसंत फुलला
गळे स्वेदधारा भेगाळे भूईरान
गुरेढोरे पक्षीपाखरं सजीवसृष्टी
साऱ्यांची कशी भागावी तहान