सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले


शुभ दिन आहे आज पाहा
सावित्रीमायच्या जयंतीचा
प्रथम महिला शिक्षिकेचा
थोर अशा क्रांतीज्योतीचा
जीवनभर करावा लागला
सनातनी समाजाशी संघर्ष
शिकविले अक्षर लेकींबाळा
मिळविला त्यातच तिने हर्ष
समाजसुधारक जोतीबांनी
प्रथम करूनी तिला साक्षर
शाळा उघडली पुण्यामध्ये
शिकवले लेकींना अ अक्षर
चंदनापरी झिजवली अशी
सावित्रीमायने तिची काया
लेकीबाळींसाठी ती आदर्श
लाविली माऊलीपरी माया
विधवा नि पतित अबलांना
दिला आपल्या घरी आश्रय
केलेच बाळंतपण अबलांचे
होते समाजात जे निराश्रय