पार्वतीच्या बाळा
पार्वतीच्या बाळा


हे पार्वतीच्या बाळा
तुला भक्तांचा लळा
तू तान्हा लडिवाळा
फुले भक्तीचा मळा
मोदकाच्या नैवेद्याची
बाप्पा तुला आवड
बनविते प्रसाद आई
काढून चांगली सवड
लापशीही बनवलीय
घालूनी हा सुकामेवा
अकरा दिवस बाप्पा
खावा मिठाईचा ठेवा
करंज्याचा ठेवी आई
नैवेद्य तो बाप्पासमोर
मूषकभाऊ आनंदाने
झाला तो भाव विभोर
खीरही करू बाप्पाला
घालून दूध नि साखर
चवीने खातील बाप्पा
नाचता दोघे हले मखर