Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shamal Kamat

Classics Inspirational

4  

Shamal Kamat

Classics Inspirational

नोकरी करणारी आई

नोकरी करणारी आई

1 min
743


आजची नोकरी करणारी आई 

तारेवरची करत असते कसरत

घर संसार अन् ऑफिसची नोकरी

याचा तोल सांभाळून झाली आहे त्रस्त

जीव जरी मेतकुटीला आला तरी

सदैव कुठल्या ना कुठल्या कामात

असते व्यस्त


अर्धे लक्ष असतं तिचं घरात

तर अर्धे लक्ष तिचं ऑफिसच्या कामात

म्हणून नाईलाजाने बाळाला ठेवावं

लागतं पाळणाघरात

कामावर जाताना बाळ असतं

गळा काढून रडत

कितीही आमिषे दाखवली तरी

रडायचं नाही थांबत


क्षणभर मनात येतो विचार तिच्या

कशाला हवं ऑफिस, कशाला हवी नोकरी

रोज रोज कामावर जाताना बाळाला

रडविणारी मी कसली आई

माझ्यासाठी बाळच आहे सर्वकाही

दुसऱ्या क्षणीच मन मात्र पालटतं


बाहेर वाढली आहे महागाई

बाळा तुझ्याच भविष्यासाठी

करते आहे मी सर्वकाही

उद्या तुला मिळाव्यात सर्व सुखसोयी

म्हणूनच जिंकायची आहे मला ही लढाई


हळवं मन करते कर्तव्य कठोर

अन् पाऊले निघू लागतात ऑफिसला जायला

दु:खाने, वेदनेने उर येतो भरून

कासावीस होत मन व्यथित अन चिंतीत

ऑफिसला गेल्यावर उशीर झाला

म्हणून बाॅस म्हणतो

आजकाल लक्ष नाही तुमचं कामात


थकून भागून घरी कामावरुन आल्यावर

बाळाला घेते ती लगेच जवळ

कानी येते कुजबूज अन् कडवट बोल

आजकाल अजिबात लक्ष नाही हीचं घरात

दोन्हीकडून होते तिची कुचंबणा

त्याला ती तरी काय करणार


एक नोकरी करणाऱ्या आईचं

द्विधा झालेलं वेदनेने तडफडणारं 

मन कोणीच नाही ओळखलं

मोठ्या झालेल्या बाळाला सुद्धा

नाही दिसलं, सूड उगवला त्याने

आई नकोशी झाली त्याला


लहानपणी ठेवले होते पाळणाघरात

म्हणून त्याने मोठेपणी आईला

ठेवले वृद्धाश्रमात

काय तिच्या नशिबी दैवगती

कुणीच समजून घेतले नाही तिला

अहो कुणीच कशाला, तुम्ही आम्ही

सर्वजण समजून घेऊ या तिला

हात जोडून सर्वांना हीच करते

कळकळीची विनंती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics