STORYMIRROR

Shamal Kamat

Others

3  

Shamal Kamat

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
318

आला सण दिवाळीचा

सणाचा असतो तो राजा

लहानांपासून थोरांना

मिळते आनंदाची मजा


नरकचतुर्दशीला पहाटेच

सगळेजण अभ्यंगस्नान करतात

पूजाअर्चा करून , अंगणामध्ये

तुळशीजवळ पणतीचे दिवे लावतात


बाबांनी लावला दारात कंदील छान

आईने सुंदर रेखाटलेली रांगोळी

मंगलमय वातावरणात बघा

जमली सारी मित्र मंडळी


लक्ष्मीपूजेला दिवाळीत

सर्वांच्या घरोघरी असतो मान

पाडव्याला पतीराजांना ओवाळता

भेटवस्तू मिळते पत्नीला छान


दरवर्षी दिवाळीत येतो

भाऊबीजेचा सण

येता सासरी भाऊराया

बहिणीच्या आनंदाला येते उधाण 


दिवाळीचा सण असतो

सगळ्यांच्या आवडीचा

तिखट गोड केलेला फराळ

सर्वांच्या सोबतीने एकत्र खाण्याचा


पाच दिवसाचा असतो

दिवाळीच्या मोठा सण

दिव्याची सुंदर आरास पाहून

सर्वांचे आनंदून जाते मन


Rate this content
Log in