प्रेम
प्रेम
1 min
73
प्रेमा तुझा रंग कसा
ज्याला त्याला आवडतो तसा
म्हणूनच सर्वांच्या जीवनात
प्रेमाच्या रंगाचा उमटतो ठसा
सर्वांनी करावे प्रेम मनापासून
नसावे ते मुळीच वरकरणी
नको भांडणतंटे, रूसणी फुगणी
प्रेमासाठी करतात मनधरणी
प्रेम सांगून होत नाही
नकळतपणे होते
जरी नजरेतून समजले तरी
शब्दांतून व्यक्त करावे लागते
रागातूनही व्यक्त होते प्रेम
प्रेमासाठी करावा लागतो त्याग
प्रेमामुळेच आयुष्यात फुलते
जीवनातील सुंदर बाग
प्रेम नाही कपोलकल्पित कल्पना
ती असते सुंदर भावना
मनाच्या सौंदर्यांची उपासना
जीवनातील मांगल्याची उपासना
