माझे गाव
माझे गाव
निसर्गाच्या सृष्टीमध्ये
हिरवाईने नटलेले
सौंदर्याने सजलेले
सगळीकडे नावाजलेले
रत्नागिरी हेच आहे
सुंदर असे गाव
हापुस आंब्यासाठी
प्रसिद्ध आहे त्याचे नाव
आंबा ,फणस, काजूच्या
दिसतील तुम्हाला बागा
त्यासाठी गावात आहे
खूप मोठी जागा
भात व मासे आहे
येथील प्रमुख अन्न
समुद्रकिनारी असून सुद्धा
गावकरी आहेत सुखी संपन्न
कौलारू घरे आहे कोकणातली
भाताची दिसतील हिरवीगार शेती
कोकणातील वाट आहे नागमोडी वळणाची
सगळीकडे दिसेल तुम्हाला तांबडी माती
नारळ ,कोकम सुपारी झाडे
सर्वांना सगळीकडे दिसतात
गावातील कोकणी माणसे सगळ्यांना
आपुलकीने या बसा म्हणतात
पर्यटन स्थळासाठी , निसर्ग सृष्टी साठी
प्रसिद्ध आहे रत्नागिरी गाव
नुसती आठवण आली तरी डोळ्यासमोर येते
जगाच्या कानाकोपऱ्यात गेले आहे त्याचे नाव