प्रेमाचा झूला
प्रेमाचा झूला
1 min
163
रोज होत होती आपली भेट
विचारपूस ही आपुलकीची
जुळून येत होते आपले सुर
नकळत प्रेमबंधनाने
तुझी माझी नजरा नजर होता
संकेत प्रीतीचा कळला
नजरेची भाषा जाणून
हृदयात बहर प्रीतीचा फुलला
केले घायाळ मजला
तार मनीची तू छेडून
तुझ्या सहवासात जात होते
सारे काही विसरून
नजरेचे इशारे तुला कळले
हृदयातले भाव तुला समजले
स्पर्शातील भाषेचे शब्द तुला उमजले
प्रीतीच्या झुल्यावर प्रेम फुलले
कधी झाले मीच तुझी
नाही कळलेच मला
सुर आपले जुळले
माझा श्वास , तुझा श्वास
एकरूप तोच झाला
कर स्वीकार प्रेमाचा
जीव तुझ्यात गुंतला
प्रीतीच्या झुल्यावर झुलण्यासाठी
