STORYMIRROR

Shamal Kamat

Others

3  

Shamal Kamat

Others

वय चाललं वाढत

वय चाललं वाढत

1 min
265

दरवर्षी जन्मदिन

होई सर्वांचा साजरा

वय चाललं वाढत

असे याकडे नजरा


वाढदिवसाचा दिन

आहे तोच आनंदाचा

वर्षातून एकदाच

साजराच करण्याचा


जसे वय ते वाढते

बालपण ते संपते

हळूहळू मोठेपण

सारे काही शिकविते


जीवनाचे आहे तत्व

करू या चुका स्वीकार

चला देऊ सुधारून

त्यांना आपण आकार


वय जरी ते वाढले

मन असावे मोकळे

निरागस व निष्पाप

बाल्या रूपाचे कोवळे


वय जरी वाढलेले

ठेवा निरोगी शरीर

मिळू द्यावा आरोग्याचा 

परमेश्वराचा वर


Rate this content
Log in