पावसाची आठवण
पावसाची आठवण
1 min
353
बालपणीचा काळ तो सुखद
येते त्याची खुप आठवण
पावसात मनसोक्त भिजायचे
किती आनंदाचे होते क्षण
शाळेत जाताना छत्री विसरायची
आईचा ओरडा खूप खायची
पावसात मस्तपैकी भिजत
मी हळूहळू घरी यायची
कॉलेजात असतांना मित्र-मैत्रिणी
जात होतो वर्षा सहलीला
निसर्गाचे राजबिंडे सुंदर
हिरवे रूप जवळून पाहायला
सजनासह पावसात भिजतांना
येते आता खूप मजा
आजारी पडल्यावर मात्र
मिळते मला मोठी सजा
पावसात भिजायला मला खूप आवडते
पावसात मी ओलीचिंब होते
किती वाजली थंडी तरीसुद्धा
बालपणीच्या आनंदाची मजा घेते
