स्त्रीचे अस्तित्व
स्त्रीचे अस्तित्व
1 min
689
सर्वानी मलाच
गृहीत धरले
कवडीमोलाची
असे समजले
अस्तित्वाचा लढा
स्वतः लढणार
काही झाले तरी
नाही हरणार
उच्च शिक्षणाने
सिद्ध करणार
दोन्ही घराण्याला
प्रकाश देणार
संस्कृती आपली
पुरुषप्रधान
त्यांना दाखवीन
बनून महान
स्त्रीचा वनवास
नाही भोगणार
स्वतःचे अस्तित्व
मी दाखविणार
अत्याचार नाही
आता सोसणार
नवयुगातली
नारी बनणार
