माझी मायबोली मराठी
माझी मायबोली मराठी
भाषा माझी मराठी आहे महाराष्ट्राची शान
सरस्वती देवीचे तिला लाभले वरदान
स्वत:ला मी समजते भाग्यवान
मराठी आहे याचा बाळगून अभिमान
बोलते मी मराठी, लिहिते मी मराठी
वाचते मी मराठी,गर्वाने, अभिमानाने
सांगते माझी माय बोली मराठी
माझी मराठी सह्रयाद्रीच्या कुशीत जन्मली
काना,मात्रा, वेलांटी,उकार चंद्रकोराने सजली
विविध साहित्य प्रकारातून नटली
भाषा माझी मराठी आहे अमृतापेक्षाही गोड
संस्कृती, परंपरेची तिला आहे जोड
ओव्या,अभंग,भारूड,गाणी
शुध्द व रसाळ मधुर वाणी
ज्ञानोबा, तुकारामांनी गायली
मराठीतून छान अभंगवाणी
माझ्या मुलांना दिले मी मराठीतून ज्ञान
तिने घडविले त्यांच्यावर संस्कार छान
परमेश्वराने तिला द्यावे तिला एकच वरदान
साऱ्या विश्वात मिळू दे तिला कायमचा मान
