STORYMIRROR

Dipali patil

Abstract Classics Inspirational

5  

Dipali patil

Abstract Classics Inspirational

संकल्प

संकल्प

1 min
397

दिवस होते महाविद्यालयीन शिक्षणाचे

सुसाट वारे अवतीभवती मनजोगते

गाव सोडून शहरात रोखणे मनाला

लाऊन कुंपण आशा आकांक्षाना संस्कारांचे .......


वर्ष पहिले जेमतेम गेले

लागले गुणपत्रिकेवर भलतेच दिवे

आलो मराठी माध्यमातून,सगळेच नवे

ठाम जाहले संकल्पवर,यश हवेच हवे .......


मार्ग त्यागला घोकंपट्टीचा,प्रत्यक्ष मुद्दे आभ्यासले

रात्रीचा केला दिवस,मौज मजेचे क्षण गमावले

गुरु होतेच मार्गदर्शक,उत्तम रित्या शिकवले

वेळ आलीय स्वतःला सिद्ध करण्याची हे ठरवले


गेले वर्ष दुसरे,पहिल्या पेक्षा बरेच बरे

आता होती खरी परिक्षा,वर्ष शेवटचे उरे

एकनिष्ठ होऊन पूर्ण केला संकल्प

उत्तीर्ण होऊन उत्तम गुणांनी,आत्मविश्वासाने साध्य खरे ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract