पहाट
पहाट


पूर्वेच्या क्षितिजावर
अवतरलें भव्य रविराज
उधळला गुलाल दाहीदिशा
दिन सोनियाचा आज
देवघर उजळले हो
न्हाहले सूर्यकिरणांनी
छटा नाना तऱ्हेच्या
भरल्या आसमंतानी
सोनसळी शिरपेच
रोवला डोंगरदऱ्यांना
सरिता हासते अविरत
रंग गर्द हिरवा वृक्षांना
उगवला दिवस उमेदीचा
निघाली बैलजोड पायवाटेने
राबू कष्टाने माळरानात
जगू अवघे आयुष्य समाधानाने