वारी
वारी
1 min
245
कशी सांगू बा व्यथा
जीव कासावीस मना
दोन वर्षे उलटली ही आस
तरी गाभारा डोळा दिसेना
वारी करू मी पायी
दिसनदिस गात भजन
झेंडा मिरवीला अस्मानी
डोयी तुळशीषिची कमान
याद येते मला विठूची
कोरोना थाम्बव थैमान
माय बाप वाट पाहि
हात काटीवरी ठेऊन
जातील जल्दी हेबी दिस
महामारी ने जीव मेटाकुटीला
दर्शन व्हयील मले
माझ्या बाचं पंढरपूरला