अबोल प्रेम
अबोल प्रेम
1 min
504
गंधाळला श्वास
आज तुझ्यासवे
सख्या प्रियतमा
हात हाती हवे
मन मुराद हा
सोहळा जगू या
डोळे भरुनिया
पापण्या मिटू या
ठेवा युगेयुगे
अबोल प्रेमाचा
मिठीत साम्राज्य
ओलावा स्पर्षांचा
सोबत राहू दे
सदैव खुशाली
नियती दुरावे
आत्मा साद घाली