नियती
नियती
1 min
228
नियती नितळ मनाची
बरकत देती मजला
आशीर्वादाने ईश्वराच्या
सौभाग्य सोहळा सजला
बरकत भाग्यलक्ष्मीची
लाभे पुण्यवानाला
आजीवन प्रामाणिक जो
अलंकार तेचि जीवनाला
तत्वतः मतभेद जरी
उद्देश असावा सात्विक
प्रेमाने जिंकू जगाला
जिव्हाळ्याचे होऊ भाविक
आदर देऊ आत्मसन्मानाने
अपेक्षा नसावी कशाची
कष्टाची भाकरी गोड मानू
वाट ना धरु लोभाची