स्पर्श
स्पर्श
1 min
252
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
हवा हवा कधी
स्पर्श का टोचतो
माझाच तो तर
सत्य हे शोधतो
सख्या तूच प्राण
तूच तो आभास
वाट पाहते मी
क्षण जपु खास
आसूसले आज
नेत्र तुझसाठी
सात जन्माच्या ह्या
बांधल्या ह्या गाठी
स्पर्श कुंद धुंद
होऊ दे मजला
सुख एकांताचे
सोहळा सजला
प्रीत अधुरी रे
भेट मनोमन
स्पर्श हा आत्म्यांचा
आठवणी धन
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺