लेखणी
लेखणी

1 min

61
मनाची साद ऐकते लेखणी
विचारांची ताकद जाणते लेखणी
भव्य तारांगण भावनांचे लेखणी
प्रत्येक कवीचा श्वास लेखणी
अन्यायाला वाचा फोडते लेखणी
गरिबाला न्याय देते लेखणी
वर्तमान जग शिकवते लेखणी
भविष्याला आकार देते लेखणी
आत्म्याचं अन अंतरात्म्याच मिलन लेखणी
बंध रेशमी परिमळ लेखणी
सत्याचा आधार लेखणी
असत्याचा काळ लेखणी
माझी लेखणी पवित्र लेखणी
सोबती माझी हवीहवीशी लेखणी