टिपूर चांदणे
टिपूर चांदणे
हे चांदणे नभात
सजले सुगंधित
धरती नाहली दवात
निळेनभ आले शिंपीत
प्रांगणी चांदणी पिठूर
रातराणी कविमनाची
टिपूर चांदण्याला हो
उपमा ही मोगऱ्याची
भरती जणू आली
तारांगणी ताऱ्यांना
प्राजक्त शुभ्र फुलला
स्वर फुटले स्वरांना
संथ लुकलूकणे
मनोवेधक दर्शन
चंद्रप्रकाश सर्वत्र
सृष्टी रसिक अर्पन
नक्षत्रे उमटली
चिरकाल आनंदी
प्रतिबिंब स्वतःची
न्याहाळती स्वानंदी