बंद दाराआडचं मरण
बंद दाराआडचं मरण
माझ्या घराच्या भिंतीची खपलं
हळूहळू पडताय
सापानं कात टाकल्यागत
साऱ्या ईटा निखळून
चाळणी झाली घराची
या लाखो भोसक्यातून
उन्हाच्या हजारो तीरपा येेतात घरात
तापलेल्या मनाला
अजूनच चटका देऊन जातात
हे अठरा विश्व दारिद्र्य आता
घरालाही सोसवेना
म्हणून रया गेलेलं माझं घर
सुटू पाहतय दुःख मुरलेल्या भिंतीपासून
ते निखळत चाललंय
या लाकडाच्या खळग्यातून
वाटतंय त्यालाही आताा सहन होईना
हे बंद दाराआडचं मरण.
