मैत्री
मैत्री
एक हात आधाराचा
एक वर माणुसकीचा
एक ओढा आपुलकीचा
एक निर्झर अंतरीचा
एक बंध भावनांचा
एक गंध खुलण्याचा
एक छंद जोपासण्याचा
एक नाद विकासाचा
एक क्षण फुलण्याचा
एक अनुभव जगण्याचा
एक भाव श्रद्धेचा
एक हट्ट भरारीचा
एक छाया वडiची
एक उब मायेची
एक दिशा आयुष्याची
एक ठेव विश्वासाची