STORYMIRROR

Pratibha Walavalkar

Inspirational

3  

Pratibha Walavalkar

Inspirational

प्रेम

प्रेम

1 min
27.9K


प्रेम कोणी ही करेना, का अशी तक्रार खोटी

प्रेम लागे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी


प्रेम वेडे माऊलीचे अंतरीची ओढ दैवी

प्रेम करडे रे पित्याचे शिस्तीची सांगते थोरवी


प्रेम कडवे शिक्षकांचे देशाचे भवितव्य घडवी

प्रेम हळवे सानुल्यांचे - लाड, कौतुक, हट्ट पुरवी


प्रेम डोळस सोयर्यांचे संकटी कामास येई

प्रेम उदात्त भाविकांचे इश-चरणी लीन होई


प्रेमाचे किती एक पैलू, श्वासांना देई उभारी

प्रेम लागे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

More marathi poem from Pratibha Walavalkar

आई

आई

1 min படிக்க

प्रेम

प्रेम

1 min படிக்க

Similar marathi poem from Inspirational