STORYMIRROR

Pratibha Walavalkar

Others

3  

Pratibha Walavalkar

Others

आई

आई

1 min
959


नात्यांची बंधनं, आपुलकी आणि जिव्हाळा

आमच्या आई म्हणजे आनंदाचा, चैतन्याचा मळा


सदा हसतमुख, लाघवी, प्रसन्न चेहेरा

परिस्थितीला तोंड देणारा उत्साहाचा निर्मळ झरा


त्यांचं 'असणं', त्यांची लगबग, त्यांचा उरक आणि त्वरा

कुठलं ही कार्य तडीस नेणारा त्यांचा आत्मविश्वास न्यारा


'आई’, ‘चित्रा ताई' , ‘काकी' – हे साऱ्या कुटुंबाचे दैवत

दुर्लभ असते मिळणे अशी ही लाखमोलाची दौलत


अडी-नडीला, गरजेला, मदतीला आई आमच्या कायम हजर

सेवेसी, कामाशी, कार्याशी - सहज, सदैव तत्पर


डोक्यात नवीन विचार, सतत काही नवीन करण्याचा ध्यास

कोणाला ही आपलंसं करण्याची त्यांची हातोटी काही खास


सांगण्यासारख्या खूप आहेत गोष्टी, आठवणींचा मळा

त्यांचं जगणं, त्यांचं करणं, त्यांच्या आयुष्याचा पटच आगळा


सान-थोर, शेजार-पाजार, सर्वानाच त्यांचा लळा

अशा व्यक्ती, असे मैत्र .... अशी माणसंच विरळा



Rate this content
Log in

More marathi poem from Pratibha Walavalkar