STORYMIRROR

kishor zote

Fantasy

3  

kishor zote

Fantasy

शब्द...

शब्द...

1 min
28.8K


आजही काही आठवतात शब्द

कधीकधी सुचतही नाहीत शब्द...

ओठापर्यंत येवून का थांबतात शब्द

ओठातल्या ओठात पुटपुटतात शब्द...

मनातल्या मनात घोळतात शब्द

अशांतही मनास करतात शब्द...

कधी कुठे जिव्हारी लागतात शब्द

कसे टोचतात अन् बोचतात शब्द...

नात्यांना बांधून ठेवतात शब्द

वर्मी असे घाव घालतात शब्द...

अंळमटळम् कानी पडतात शब्द

जीवही तो कानात आणतात शब्द...

भावभावना मोकळे करतात शब्द

भावनांचा कोंडमारा करतात शब्द...

छाती ती फुगवतात कौतुकाचे शब्द

जिवंतपणी मारतात अपमानाचे शब्द...

जखमेवर मलम बनतात शब्द

जखमेची खपली काढतात शब्द...

एका आवाजाने चित्त वेधतात शब्द

नावडतेही कानी पडतात शब्द...

प्रेमभावनेला सांगतात शब्द

जिभेने वारही करतात शब्द...

शब्दाने शब्द असे वाढवतात शब्द

प्रत्येक मिठीमधे विरघळतात शब्द...

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy