"मोबाईलचं वेड" (बालगीत)
"मोबाईलचं वेड" (बालगीत)
मोबाईलचं वेड तुला
लयं लागलंय बाई
माझ्यासाठी थोडा
वेळ दे ना आई ।।धृ।।
चार्जिंगला लावून दे
मोबाईल ला फास
माझ्यासाठी सोडून दे
मोबाईल चा ध्यास ।।१।।
मोबाईल चा लई बाई
लागलाय तुला लळा
बाजूला ठेऊन त्याला
दोन घास भरव बाळा ।।२।।
मोबाईलवर सदा
असते तू अन ताई
शाळेत जाण्या- आवरण्याची
माझी होते घाई ।।३।।
दिनरात मोबाईल
असतो तुझ्या उशाला
हाका मारून कोरड
पडते माझ्या घशाला ।।४।।
आज घरी येताना
मोबाईल दे फेकून
बोट माझं धरून
चाल जरा वाकून ।।५।।
मोबाईल चा शोध जर
लागला नसता बाई
कडेवर घेतलं असतं
तू मला आई ।।६।।