STORYMIRROR

Prashant Kadam

Fantasy

4  

Prashant Kadam

Fantasy

शपथ तुला !

शपथ तुला !

1 min
27.7K


जर काही काम बिघडले तर

किंवा काही अडचण आली तर

मदत करशील का मला

शपथ तूला

हे माझे प्रिया

हे माझे प्रिया


ना कोणी आहे, ना कोणी होतं

माझ्या जीवनात , तुझ्या विना

तूझ्यावरच प्रेम माझे

हे समजणार कसे तूला,

समजून घेशील का मला

शपथ तूला

हे माझे प्रिया

हे माझे प्रिया


जर कधि बोलावे वाटले तर

किंवा भेटावेसे वाटले तर

तू साद घालशील का मला

मी प्रतिसाद देईन तूला,

देशील का साथ मला

शपथ तूला

हे माझे प्रिया

हे माझे प्रिया


ना मी विसरू शकतो तूला

ना तू विसरू शकते मला

मैत्री आहे आपली खरी

हे कधी कळेल का तूला,

पुढे करशील का हात मला

शपथ तूला

हे माझे प्रिया

हे माझे प्रिया


मी आहे तूझ्यासाठी

तू आहे माझ्याच साठी

जन्मोजन्मी आपण राहू

फक्त एकमेकां साठी,

सोबत देशील का मला

शपथ तूला

हे माझे प्रिया

हे माझे प्रिया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy