Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Abasaheb Mhaske

Fantasy


1.4  

Abasaheb Mhaske

Fantasy


ती अन आठवणीतला पाऊस ..

ती अन आठवणीतला पाऊस ..

1 min 14.2K 1 min 14.2K

ती अन आठवणीतला पाऊस ...

दोघेही करतात नखशिखांत चिंब - चिंब 

ती आठवणींच्या रूपात भिजवून अन तू ..

मनसोक्त ..धुव्वाधार... कोसळून...  

 

आभाळ भरून आलं म्हणजे  

आपसूक तिची आठवण येते...

तीच उत्कंठा तिला भेटण्याची 

ओढ जशी वसुंधरेला पावसाची ... 

 

मन उदास होतं... जीव होतो वेडापिसा 

मी सैरभैर होतो... तिच आठवत राहते ...

दूर कुठेतरी चातक  भावविभोर होतो  

जणू तो माझ्यासाठीच विरहगीत गातो ... 


तो हि येतो वेळी - अवेळी तुझ्या आठवणींसारखा

आणि जातोही अगदी तसाच करून मला पोरका ...

तू गेलीस तेव्हा बेभान होऊन पाऊस बरसत होता

लहानग मुलं होऊन वाकोल्या दाखवून मज खिजवत होता .. 

 


तूच सांग गडे का असं छळतेस ? आठणीतला पाऊस बनून...

काय तुमचे लागे - बांधे तू त्यालाही सोबत आणतेस ... 

कुणास ठाऊक का असं होतं ? पाऊस तुझा पाठीराखाच ना ?

कितीही नाही म्हटलं तरी तू अन पाऊस दुःख आमचं जाणता ... 


फरक फक्त एवढाच त्याचा हंगाम ठरलेला 

तुझी आठवण मात्र रात्रंदिनी , बारमाही ...

सांगून बघितलं दोघांनाही अवेळी नका रे असं जाऊ  

आठवणी त्या कसल्या नि सांगून येईल तो कसला पाऊस ?Rate this content
Log in

More marathi poem from Abasaheb Mhaske

Similar marathi poem from Fantasy