STORYMIRROR

Pandit Warade

Fantasy

4  

Pandit Warade

Fantasy

सांजवेळ

सांजवेळ

1 min
29K


झाली सांजवेळ आता

पक्षी घरट्यात आले

पश्चिमेला सूर्यदेव

घरी जायला निघाले।।१।।


कर्मयोगी दिनकर

लालबुंद कसा झाला

लाली कर्माची चढली

भास्कराच्या चेहऱ्याला।।२।।


कुणी घराच्या ओढीनं

वासराच्या साठी गाई

निघे धावत पळत

साऱ्यांनाच झाली घाई।।३।।


सूर्यदेव निघे जणू

रजनीला भेटायला

कामकाज आटोपले

जाणे आता विसाव्याला।।४।।


घरीदारी, देवापाशी

सांज होता लागे दिवा

जीवनाच्या सांजवेळी

दिवा अंतरी पेटवा।।५।।


लावा ज्ञानदीप आता

आपापल्या अंतर्यामी

सांजवेळ होता होता

वेध लागो निजधामी।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy