Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Kadam

Fantasy

4.0  

Prashant Kadam

Fantasy

या मेघांनो !

या मेघांनो !

1 min
20.6K


या मेघांनो, प्रफुल्लीत करा

अाल्हाद, समवेत फुलवित रहा

असेच या गगनी, असेच हसा

आभाळात ह्या, दाटून रहा


मेघ दाटले, नभी मोकळ्या

मोहरल्या, कुंद फुल पाकळ्या

अन अचानक, बहरुनी थिरकला

मोर ही, मयुरपंखांनी सजला


या मेघांनो, प्रफुल्लीत करा

अाल्हाद, समवेत फुलवित रहा

असेच या गगनी, असेच हसा

आभाळात ह्या, दाटून रहा


सुरू जाहले, नाद स्वर गगनी

लखलखल्या, वीजा ही नयनी

गार वारा वाहे, स्वैर होवूनी

थंड वारे वाहती चहू दिशांनी

टपटप आल्या जलधारा बरसूनी


या मेघांनो, प्रफुल्लीत करा

अाल्हाद समवेत फुलवित रहा

असेच या, गगनी असेच हसा

आभाळात, ह्या दाटून रहा


रूप अवघे, सहज बदलले

डोंगर माथे, शीतल सजले

हरीततृणांनी, झूलू लागले

नदीनाले, खळखळूंन भरले


या मेघांनो, प्रफुल्लीत करा

अाल्हाद, समवेत फुलवित रहा

असेच या गगनी, असेच हसा

आभाळात, ह्या दाटून रहा


संतत धार ही, सूरु राहु दे

काळ्या आईला, चिंब होवू दे

मायेने अंकुर, तिला जगवू दे

बळीराजाला आनंद, मिळू दे


या मेघांनो, प्रफुल्लीत करा

अाल्हाद समवेत, फुलवित रहा

असेच या, गगनी असेच हसा

आभाळात, ह्या दाटून रहा


Rate this content
Log in