STORYMIRROR

Rucha Rucha

Abstract Fantasy Inspirational

4  

Rucha Rucha

Abstract Fantasy Inspirational

मी आहे पैठणी

मी आहे पैठणी

1 min
664

अशा काय पाहताय साऱ्या जणी

ओळखलं नाहीत का मला?

मी तुमची सखी लाडकी पैठणी

असते माझी घरोघरी पाहणी ।।


आया, बाया पोरी ग तुम्ही

अधिक खुलून दिसता

ज्यावेळेस तुम्ही साऱ्या

रेखीव मला नेसता ।।


होय!मी आहे पैठणी

सगळ्या साड्यांची राणी

पेशवाईच्या इतिहासात दिसते

सर्वत्र माझीच कहाणी ।।


जरतारी चा पदर माझा

त्यावरी आहे चौकडा

रेशीम धाग्यांनी विणलेला

मोर दिसतो नाचरा ।।


लावण्याची खाण मी पैठणी

खुलविते सौंदर्य स्त्रियांचे

बोलतात मैत्रिणी माझ्या

गुज त्यांच्या मनीचे ।।


नव्या युगात देखील मी

थाट माझा मिरवतेय

फॅशन जीन्सच्या युगातही

माझा देखणेपणा टिकवतेय!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract