मनाचे गूढ आडोसे
मनाचे गूढ आडोसे
मन असावं निर्झरासारखं
सदा खळाळणारं
मन असावं प्रपातासारखं
सदा कोसळणारं
मन असावं संगमरवरी
सदा निर्मळ असणारं
मन असावं सरितेसारखं
सतत वाहत रहाणारं
मनालाही थांबावसं वाटतं
गूढ आडोशांच्या आड
काही लपवावसं वाटतं
कधी राग द्वेष उद्वेग चिंता
सगळं मुखवट्याआड असतं
ते बाहेर येतच नाही कधी
आत आत आडोशांच्या राहून
त्याची जाळी बनली जाते
जी मनाला गढूळ बनवते
एकदा मनाला झटकायलाच हवं
गूढ आडोशांच्या आड दडलेलं
बाहेर टाकायलाचं हवं
