ये रे लवकरी तू श्रावणा
ये रे लवकरी तू श्रावणा
आला हासत नाचत
श्रावण हर्षभरे
सणवार व्रतवैकल्ये
सृष्टी फुले मोदभरे
कसा सरला महिना
रक्षाबंधन कृष्णजन्म
आता लागली चाहूल
सरत आला गं श्रावण
मना उगा लागे हुरहूर
मनोमनीचा तू सखा
आता सरतो श्रावण
कसा देऊ रे निरोप
मन भरुन आले रे
डोळे पाणावले माझे
सख्या तुझ्या निघण्याने
पुन्हा नेमेचि येशील
हर्षभरे मोदभरे
वाट तुझी पाहीन मी
माझ्या श्रावण सख्या रे
आता बाप्पा आगमन
पाणी डोळ्यात नको रे
मन आवरुन माझे
तयारीला मी लागते
तरी मनातील गुज
सख्या तुला मी सांगते
ये रे श्रावणसख्या
वाट माहेराची पाहते
हासत नाचत येशील
श्रावणसख्या परतून
येशील श्रावणसख्या परतून
.........................................
सौ. मनीषा आवेकर
पुणे
फोन 9763706200
..............................
