पालवी
पालवी
सूर जुळता सख्याशी
सखीमन पालवते
आनंदाच्या झूल्यावरी
मन हर्षाने झुलते
भाव यौवनसुलभ
मनी प्रीतीच्या भावना
सख्यासवे विहरता
उरी दाटती भावना
मन फुलूनी येतसे
बहरणे उमलणे
सुखदायी अंतर्यामी
मन सुखे पालवणे
असा बहर मनाला
सहवासे सुखावतो
बंध मानसी जुळता
प्रेमवृक्ष बहरतो
................................
सौ. मनीषा आवेकर
................................
