संसाराचा रथ
संसाराचा रथ
काव्यप्रकार अभंग
रचना ६/६/६/४
संसाराचा रथ / चाके पतीपत्नी
दोघेही मिळूनी / सारथ्यासी // (१)
नवतीचे दिन / भिजती प्रेमात
कौतुक मनात / सर्वांचिया // (२)
नव्या नवरीला / नसे अनुभव
शब्दांचे लाघव / जाण मनी //(३)
रथ धावे वेगे / चौखूर उधळे
मस्तीत नकळे / दोघांनाही //(४)
नवलाई जाता / वास्तव सृष्टीत
रोपटे भूमीत / नव्या रुजे //(५)
संसार आगर / विविध रसांचे /प्रेम फलिताचे / गुंजारव //
(६)
संसार प्रेमाचा / फळे लगडता
लज्जत वर्धता / बहरतो //(७)
मर्म संसाराचे / चातुर्ये जाणावे
संयमी रहावे / नित्य मनी //(८)
संकटे सामोरी / वेगास मर्यादा
देवावरी श्रद्धा / मनोभावे //(९)
गतीमान रथ / हात घेती हाती
समाधानी वृत्ती / हर्ष मनी //(१०)
मर्म संसाराचे / चाणाक्ष जाणती
यथायोग्य गती / पैलतीरी // (११)
........................................ ..
सौ. मनीषा आवेकर.
फोन 9763706200...................................
