दिन आपुला स्वातंत्र्याचा
दिन आपुला स्वातंत्र्याचा
स्वातंत्र्याच्या ध्यासासाठी
बलिदान हुतात्म्यांचे
दिन उगवे हर्षाचा
फल तयांच्या त्यागाचे
लाल किल्यावर डोले
शान ही भारतीयांची
असा फडके तिरंगा
देऊ सलामी मानाची.
शाळा काँलेज कचेरी
ध्वज वंदन मानाने
ध्वज आरोहण नभी
हुतात्म्यांच्या स्मरणाने
सौभाग्याने लाभलेली
जन्मभूमी भूवरती
प्राणापणे वाढवुया
स्वातंत्र्याची जगी कीर्ती.
राहू सारे एकदिले
नको दुही मनामधे
करु विकास देशाचा
हीच आण मुखामधे
....................................
सौ. मनीषा आवेकर
पुणे
फोन 9763706200
....................................
