जिवती माते नमोस्तुते
जिवती माते नमोस्तुते
आला आला श्रावण, करु जरा जिवंतिका पूजन
जिवंतिका भक्तां देते, दीर्घायुष्याचे वरदान /1/
जिवतीची प्रतिमा थोर, चार देव देवता मिळून
नरसिंह कृष्ण जिवती, बुध गुरुंना वंदन /2/
जरा जिवंतिकांची, कहाणी बालक जन्माची
दीर्घायुष्याची कामना,
करी छोट्या बालकांची
/3/
बुध देई बुद्धिमत्ता, तर गुरु शिक्षण विवेक
अहंकार मद उच्चाटन,
भावे प्रार्थना देवास/4/
आज श्रावणी शुक्रवारी,
करु जिवतीचे पूजन
माते सकलां लाभावे,
दीर्घायुष्याचे वरदान/5/
............................
सौ. मनीषा आवेकर
पुणे
फोन 9763706200
............................
